विराटचे कसोटीप्रेम वाखाणण्याजोगे, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडून कौतुक

4466

सध्याच्या युवा पिढीचा कल टी-20 क्रिकेटकडे अधिक असतो. लवकरात लवकर श्रीमंत होण्याच्या दृष्टिकोनामुळे त्यांना कसोटी क्रिकेटचे महत्त्व कळत नाही. मात्र अशा जनरेशनमध्ये जन्म घेऊनसुद्धा विराट कोहलीचे कसोटीप्रेम उल्लेखनीय व वाखाणण्याजोगे आहे. त्याच्या समर्पणामुळे असंख्य युवकांची पावले कसोटी क्रिकेटकडे वळतील. कसोटी क्रिकेटला तो आव्हान समजतो. टीम इंडियाचा कर्णधार असा विचार करीत असेल तर याचे पडसाद हिंदुस्थानची नव्हे तर जागतिक क्रिकेटवर पडू शकतात, अशा शब्दांत टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराट कोहलीचे कौतुक केले आहे.

बुमराह ऍण्ड कंपनीवर विश्वास
जसप्रीत बुमराह हा हिंदुस्थानी गोलंदाजीचा कणा आहे. त्याच्यासह सर्व गोलंदाज हिंदुस्थानला न्यूझीलंडमध्ये विजय मिळवून देण्याची क्षमता बाळगतात, असा विश्वास रवी शास्त्री यांनी यावेळी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेदरम्यान समजले की, हिंदुस्थानचे गोलंदाज जागतिक स्तरावर अधिराज्य करतील.

असा कर्णधार नाही बघितला
आपल्या जीवनात मी विराट कोहलीसारखा परफेक्ट कर्णधार अद्याप बघितलेला नाही. त्याच्या खेळामध्ये दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. तो मैदानात वेगळीच ऊर्जा घेऊन येतो. असे करताना कोणालाही पाहिले नाही. योजनांमध्ये तो थोडासा मागे असेल, मात्र वेळ व अनुभवाने त्यामध्येही सुधारणा होईल, असे रवी शास्त्री यांना वाटते.

आपली प्रतिक्रिया द्या