बुमराहच्या सिक्स पॅकवर नेटकरी झाले फिदा

21

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानचा ‘डेथ ओव्हर्स’ स्पेशलिस्ट गोलंदाज जसप्रीत बुमराह सोशल मीडियावर भलताच अॅक्टिव्ह असतो. बुमराहने काल सिक्स पॅक अॅब्स दाखवणारा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. फिटनेसबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी त्याने या फोटोसोबत कॅप्शनही दिले आहे. ‘स्वत:ला नेहमी सिद्ध करण्यासाठी तुम्ही उत्साही राहणे आवश्यक आहे. त्यासाठी परिश्रम घेणे गरजेचे आहे. नेहमी फिट राहा आणि आपल्या कामगिरीत सतत सुधारणा करा’, असे कॅप्शन त्याने फोटोसोबत दिले आहे.

बुमराहने हा फोटो शेअर केल्यानंतर त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. महिला नेटकऱ्यांनी बुमीच्या या फोटोवर प्रेमाचा वर्षाव केला आहे, तर काहींनी त्याच्यावर न्यूड फोटो टाकल्याने टीकाही केली आहे. मात्र बुमराहच्या नवीन अवतारामुळे सर्वच लोक बुचकाळ्यात पडले आहेत. याआधी बुमराहने व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता.

सध्या हिंदुस्थानचा संघ श्रीलंकेविरुद्ध कोलकातामध्ये पहिली कसोटी खेळत आहे. कसोटीमध्ये अजूनही बुराहला संधी देण्यात आलेली नाही. मात्र टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये बुमराहने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. बुमराहने २८ एकदिवसीय सामन्यात ५२ बळी घेतले असून आयसीसीच्या क्रमवारीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. तर, टी-२०मध्ये ३० सामन्यात त्याने ४० बळी घेतले असून क्रमवारीत तो पहिल्या स्थानावर विराजमान आहे.

आपली प्रतिक्रिया द्या