…म्हणून हिंदुस्थानी खेळाडूंना २ मिनिटात उरकावी लागतेय अंघोळ!

26

सामना ऑनलाईन । केपटाऊन

हिंदुस्थानी संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. हिंदुस्थानी संघ मालिका सुरू होण्याआधी कसून सराव करत आहे. मात्र घाम गाळून सराव करणाऱ्या हिंदुस्थानी संघाला २ मिनिटात आंघोळ उरकावी लागत आहे. दक्षिण आफ्रिकेत सध्या दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेतील अनेक शहरांना पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. या परिस्थितीमुळे केपटाऊन शहराच्या स्थानिक प्रशासनानं सर्व नागरिकांना एका दिवसाला ८७ लीटरपेक्षा जास्त पाणी वापरण्यास मनाई केली आहे. याचाच फटका हिंदुस्थानी खेळाडूंनाही बसला आहे.

या संपूर्ण स्थितीमुळे हिंदुस्थानी खेळाडूंना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दक्षिण आफ्रिकेत हिवाळ्यामध्ये नेहमीपेक्षा जास्त कोरडं असलेलं हवामान, भूजलाची घटलेली पातळी आहे. या भीषण स्थितीमुळे तेथील प्रशासनानं पाण्याच्या वापरावर ‘लेव्हल ६’चे निर्बंध घातले आहेत. हे नियम मोडल्यास १० हजार रँड्स (सुमारे ५१ हजार रुपये) दंड ठोठावला जाऊ शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या