टीम इंडियाच्या स्टार महिला खेळाडूच्या हॉटेल रुममधून रोकड, दागिने अन् घड्याळं लंपास, इंग्लंडमधील धक्कादायक घटना

टीम इंडियाची स्टार खेळाडू तानिया भाटिया (Taniyaa Bhatia) हिला इंग्लंडमध्ये एका वाईट अनुभवाचा सामना करावा लागला. लंडनच्या मेडा वेल येथील हॉटेल मॅरियटमधील (Marriot Hotel London) तिच्या रुममध्ये चोरी झाली आहे. चोराने रुममधून तिची बॅगच पळवून नेली. तानियाने स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली.

टीम इंडियाचा महिला संघ 10 सप्टेंबर ते 24 सप्टेंबरपर्यंत इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात दोन्ही संघात प्रत्येकी तीन टी-20 आणि वन डे सामन्यांची मालिका खेळण्यात आली. या मालिकेत तानिया भाटियाने टीम इंडियाचे प्रतिनिधीत्व केले. मात्र या मालिकेदरम्यान तानिया भाटिया हिच्या हॉटेलमधील रुममधून चोरी झाल्याचे समोर आले आहे.

मॅरीएट हॉटेल लंडन यांच्या एकूणच व्यवस्थापनामूळे मला धक्का बसला आहे. तशीच मी नाराजही झाली आहे. कोणीतरी माझ्या रूममध्ये येतो आणि माझ्या बॅगमधील रोख रक्कम, कार्ड्स, माझे दागिने, घड्याळं चोरून नेतो. मॅरिएट हॉटेल खूपच असुरक्षित आहे. आशा करते की, लवकरात लवकर या प्रकरणाची चौकशी होईल आणि यावर कारवाई केली जाईल. सुरक्षेची खूपच खराब व्यवस्था. इंग्लंड क्रिकेट बोर्ड पुढील काळात याबाबत काळजी घेईल, असे ट्विट तानियाने केले आहे.

तानिया भाटिया हिंदुस्थानी संघासह इंग्लंड दौऱ्यावर होती. मात्र, तिला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. या दोऱ्यात टी20 मालिकेत हिंदुस्थानी संघाला 2-1 असा पराभव पत्करावा लागला. मात्र, त्यानंतर झालेल्या वनडे मालिकेत हिंदुस्थानी संघाने 3-0 असे निर्भेळ यश मिळवले.

दीप्तीने नियमानुसारच कृती केलीय; ‘बार्मी आर्मी’ने नवे नियम वाचून टीका करावी!