धोनीचा कृष्णावतार पाहीलात का ?

437

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

देशभऱात श्रीकृष्ण जन्मोत्सवाची धूम सुरू असून टीम इंडीयाचा माजी कप्तान महेन्द्र सिंह धोनीही जन्माष्टमी साजरी करण्यात मग्न झाला आहे. श्रीकृष्णाचा भक्त असलेला धोनी बासरी वाजवत कान्हाचा जन्मदिवस साजरा करत आहे. बासरी वाजवतानाचा धोनीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून मैदानात चौकार षटकार मारणाऱ्या आक्रमक धोनीचं हे कृष्णरुप त्याच्या चाहत्यांनाही भलतेच भावले आहे.

धोनी ज्या पद्धतीने बासरी वाजवताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे ते पाहून त्याला बासरी वाजवण्याची कला अवगत असल्याचं स्पष्ट झालं आहे. धोनी बासरी वाजवत असताना त्याच्यामागे टीम इंडीयाचे अनेक खेळाडू उभे असल्याचं दिसत आहे. सात सेकंदाच्या या व्हिडीओला हजार लोकांनी लाईक केले आहे.

>

आपली प्रतिक्रिया द्या