धवनकडून रेट्रो जर्सीचा फर्स्ट लूक रिव्हील

ऑस्ट्रेलिया दौऱयावर असलेली ‘टीम इंडिया’ वन डे आणि टी-20 मालिकेत नव्या जर्सीमध्ये मैदानावर दिसणार आहे. सलामीवीर शिखर धवनने मंगळवारी ही नवी जर्सी परिधान करून सोशल मीडियावर फोटो शेअर केला. ‘नवीन जर्सीत, नव्या प्रेरणेसह विजयासाठी सज्ज’ अशी ओळ लिहून धवनने हा फोटो शेअर केलाय. 70च्या दशकात हिंदुस्थानी क्रिकेटपटू जी रेट्रो जर्सी घालून खेळायचे त्याच प्रेरणेतून ही नवी जर्सी बनविण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱयापासून हिंदुस्थानी संघाच्या किट स्पॉन्सर्समध्ये बदल करण्यात आले असून एमपीएल हा ब्रॅण्ड पुढील तीन वर्षांसाठी टीम इंडियाचा किट स्पॉन्सर असणार आहे. त्यामुळे आता ‘टीम इंडिया’ ब्लू जर्सीऐवजी नेव्ही ब्लू शेडच्या जर्सीमध्ये मैदानावर उतरणार आहे. सलामीवीर शिखर धवनने याच रेट्रो जर्सीचा फर्स्ट लुक रिव्हील केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या