न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाचा टी-20 संघ घोषित, हार्दिक पांड्याला संघात स्थान नाही

1625

येत्या 24 जानेवारीपासून सुरू होणाऱया न्यूझीलंड दौऱयासाठी हिंदुस्थानचा टी-20 संघ रविवारी बीसीसीआयने आपल्या मुंबईतील बैठकीत जाहीर केला. या संघात अष्टपैलू हार्दिक पांडयाला स्थान देण्यात आलेले नाही. हिंदुस्थानी संघ या दौऱयात 5 टी-20 लढती खेळणार आहे.

न्यूझीलंड दौऱयावर जाणाऱया हिंदुस्थानी संघात नवोदित वेगवान गोलंदाज नवदीप सैनी, मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर यांनाही स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या संघात मुंबईच्या 4 क्रिकेटपटूंना स्थान देण्यात आले आहे.

हिंदुस्थानी संघ ः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रवींद्र जाडेजा आणि शार्दूल ठाकूर.

आपली प्रतिक्रिया द्या