न्यूझीलंडविरुद्ध वन डे मालिकेसाठी संघ जाहीर, धवनच्या जागी ‘या’ 2 खेळाडूला संधी

न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या आगामी एक दिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर झाला आहे. दुखापतीमुळे संघातून बाहेर फेकल्या गेलेल्या शिखर धवनच्या जागी पृथ्वी शॉ याला संधी मिळाली आहे. तसेच टी-20 मालिकेसाठी धवनच्या जागी संजू सॅमसन याची वर्णी लागली आहे.

टीम इंडियाचा संघ न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना, पाहा संपूर्ण वेळापत्रक

न्यूझीलंडच्या दीर्घ दौऱ्यात टीम इंडियाला पाच टी-20 सामने, तीन एक दिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. याआधी हिंदुस्थानच्या टी-20 संघाची घोषणा करण्यात आली होती. आता मंगळवारी एक दिवसीय मालिकेसाठीही संघ जाहीर करण्यात आला. खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे शिखर धवन संपूर्ण मालिकेला मुकणार आहे. टी-20 मालिकेसाठी धवनच्या जागी संजू सॅमसन, तर एक दिवसीय मालिकेत पृथ्वी शॉ याला संधी मिळाली आहे.

पृथ्वीला वन डे मध्ये पदार्पणाची संधी
डोपिंगमध्ये अडकलेल्या आणि त्यानंतर दुखापतीमुळे संघातून बाहेर फेकल्या गेलेल्या पृथ्वीला वन डे क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी आहे. न्यूझीलंड दौऱ्यामध्ये हिंदुस्थान अ संघाकडून खेळताना पृथ्वीने तुफानी दीडशतक ठोकले होते. याचा त्याला फायदा झाला आहे. त्यात धवन दुखापतग्रस्त झाल्याने पृथ्वीला लॉटरी लागली. कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या पृथ्वीला अंतिम 11 मध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.

टी-20 मालिकेसाठी हिंदुस्थानचा संघ –
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक) शिवम दुबे, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्‍मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन.

prithwi-sho-sanju-samson

वनडे मालिकेसाठी हिंदुस्थानचा संघ –
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक)) शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्‍मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर, केदार जाधव, पृथ्‍वी शॉ.

आपली प्रतिक्रिया द्या