दिल्लीवर मुंबई भारी, टीम इंडियाच्या संघात एकाचवेळी पाच ‘मुंबईकर’

8437

टीम इंडिया आणि न्यूझीलंड संघात होणाऱ्या आगामी तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी संघ मंगळवारी रात्री उशिरा जाहीर झाला. निवड समितीने 16 सदस्यीय संघाची घोषणा केली असून यात मुंबईच्या पाच खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये एक नाव टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्मा याचेही आहे.

न्यूझीलंडविरुद्ध वन डे मालिकेसाठी संघ जाहीर, धवनच्या जागी ‘या’ 2 खेळाडूला संधी

हिंदुस्थानचा संघ पाच जानेवारी ते 11 जानेवारीदरम्यान न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची एक दिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी जाहीर झालेल्या संघात पाच मुंबईकरांचा समावेश आहे. यात पहिले नाव रोहित शर्मा, दुसरे पृथ्वी शॉ, तिसरे श्रेयस अय्यर, चौथे अष्टपैलू शिवम दुबे आणि पाचवे नाव वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर याचे आहे. हे सर्व खेळाडू मुंबईकडून खेळतात, मात्र आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघाचे प्रतिनिधित्व करतात.

एमसीएसाठी गर्वाचा क्षण

हिंदुस्थानच्या 16 सदस्यीय संघात पाच मुंबईकरांचा समावेश होणे मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) साठी गर्वाचा क्षण म्हणावा लागेल. मुंबईसह दिल्लीच्याही तीन खेळाडूंना हिंदुस्थानच्या संघात स्थान मिळाले आहे. कर्णधार विराट कोहली, यष्टीरक्षक ऋषभ पंत आणि नवदीप सैनी हे राष्ट्रीय स्तरावर दिल्लीचे प्रतिनिधित्व करतात.

एक दिवसीय मालिकेसाठीचा संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केदार जाधव, शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकुर.

आपली प्रतिक्रिया द्या