#INDvsNZ कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर, रोहितच्या जागी ‘या’ तरुण खेळाडूला संधी

पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश संपादन करणाऱ्या हिंदुस्थानी क्रिकेट संघाला वन डे व कसोटी मालिकेपूर्वी धक्का बसला आहे. टीम इंडियाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा दुखापतीमुळे आगामी मालिकेत खेळू शकणार नाही. पोटरीच्या दुखापतीमुळे रोहित शर्मा उर्वरित न्यूझीलंडमधील मालिकांना मुकणार आहे. रोहित शर्माच्या जागी एक दिवसीय क्रिकेटमध्ये मयांक अग्रवाल, तर कसोटी क्रिकेटमध्ये तरुण खेळाडू शुभमन गिल याची वर्णी लागली आहे.

न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी मंगळवारी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला. कसोटी मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या 16 खेळाडूंच्या संघामध्ये रोहित शर्माच्या जागी शुभमन गिल याला संधी देण्यात आली आहे. संघाची धुरा विराट कोहलीकडे कायम असून उपकर्णधारपदाची धुरा अजिंक्य रहाणे याच्याकडे आहे.

21 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या संघामध्ये ऋद्धिमान सहा आणि ऋषभ पंत या दोन यष्टीरक्षकांचाही निवड करण्यात आली आहे. तसेच सध्या दुखापतग्रस्त असणाऱ्या इशांत शर्माचे यात नाव असून फिटनेस टेस्टनंतरच तो या दौऱ्यासाठी पात्र ठरणार आहे.

न्यूझीलंडचा कर्णधार वन-डे सामन्यातून बाद, वाचा कारण

कसोटी मालिकेसाठीचा हिंदुस्थानचा संघ –
विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋद्घिमान सहा (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी आणि इशांत शर्मा.

वन डे मालिकेसाठी मयांकच्या नावावर शिक्कामोर्तब
उद्या पाच फेब्रुवारीपासून टीम इंडिया आणि न्यूझीलंड संघात तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी रोहित शर्मा याच्या जागी मयांक अग्रवाल याची निवड करण्यात आली आहे.

blockquote class=”twitter-tweet”>

NEWS : Rohit Sharma has been ruled out of the upcoming ODI and the Test series against New Zealand.

Mayank Agarwal has been named as his replacement in the ODI squad. #NZvIND #TeamIndia pic.twitter.com/AUMeCSNfWQ

— BCCI (@BCCI) February 4, 2020

आपली प्रतिक्रिया द्या