अखेर चॅम्पियन्स ट्रॉफीत हिंदुस्थान खेळणार, सोमवारी संघ निवड

17

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मिनी वर्ल्डकप म्हणजेच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हिंदुस्थान खेळणार की नाही? असा प्रश्न अनेक दिवसांपासून चर्चेत होता. या चर्चेला पूर्णविराम देत १ जूनपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हिंदुस्थानी संघ खेळणार असल्याची माहिती बीसीसीआयचे कार्यवाहक अध्यक्ष सी.के. खन्ना यांनी दिली आहे. सोमवारी संघ निवडीबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तातडीने टीम इंडियाची निवड करा! प्रशासक समितीचे बीसीसीआयला आवाहन

बीसीसीआय आणि आयसीसी यांच्यामध्ये मिळकतीच्या हिश्श्यावरून वाद निर्माण झाल्यानं हिंदुस्थानी संघ चॅम्पियन्स ट्रॉफिमध्ये न पाठवण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता होती. २५ एप्रिल संघ निवडण्याची अंतिम तारीख होती. मात्र बीसीसीआयनं स्पर्धेसाठी संघ निवडला नाही त्यामुळे या शक्यतांना बळ मिळाले होते. मात्र बीसीसीआयनं या सर्व शक्यतांना पूर्णविराम देत हिंदुस्थानी संघ स्पर्धेत भाग घेणार असं म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालय नियुक्त बोर्डाच्या प्रशासकीय समितीने (सीओए) लवकरात लवकर राष्ट्रीय निवड समितीची बैठक बोलवा आणि हिंदुस्थानी संघाची निवड करा असं आवाहन केलं होतं.


१ जूनपासून इंग्लंडमध्ये आयसीसीच्या दुसऱ्या मोठ्या स्पर्धेला (चॅम्पियन्स टॉफी) सुरुवात होत आहे. हिंदुस्थानी संघाचा पहिला सामना ४ जूनला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या