72 वर्षात पहिल्यांदाच स्वातंत्र्यदिनी टीम इंडियाने दिली विजयाची भेट

577

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आज देशभरात स्वातंत्र्यदिन दणक्यात साजरा होत असताना टीम इंडियाने देशवासियांना विजयाचे गिफ्ट दिले आहे. टीम इंडियाने वेस्ट इंडिजला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सहा विकेट्सने धूळ चारली असून मालिका देखील खिशात घातली आहे. स्वातंत्र्याच्या 72 वर्षात टीम इंडिया पहिल्यांदाच स्वातंत्र्यदिनी झालेला सामना जिंकली आहे त्यामुळे हा सामना टीम इंडियासाठी ऐतिहासिक ठरला आहे.

वेस्ट इंडिज व हिंदुस्थान मधील तिसरा एकदिवसीय सामना हा 14 ऑगस्टला हिंदुस्थानी वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू झाला. या सामन्याचा निकाल लागेपर्यंत रात्रीचे तीन वाजले होते व हिंदुस्थानच्या 72 व्या स्वातंत्र्यदिनाला सुरुवात झालेली. हा सामना जिंकून विराट ब्रिगेडने देशवासियांना स्वातंत्र्यदिनाची भेट दिली आहे. त्यात विराट कोहलीचे शतक ही देखील चाहत्यांसाठी पर्वणी ठरली.

याआधी 15 ऑगस्टला टीम इंडिया प्रत्येकी दोनदा इंग्लंड व श्रीलंकेसोबत सामना खेळली आहे. मात्र या चारही सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला होता. त्यामुळे बुधवारी झालेल्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवत इतिहास बदलला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या