‘फत्तेशिकस्त’ टीमकडून ‘छत्रपतींना’ मानाचा मुजरा

सामना ऑनलाईन । मुंबई

”निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु । अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ॥” असे ज्यांचे यथार्थ वर्णन केले जाते त्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे मराठेशाहीच्या इतिहासातील सुवर्णक्षणच. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३४६ वा शिवराज्याभिषेक दिन राज्यभरात दिमाखात साजरा होत असताना ‘फत्तेशिकस्त’ या आगामी ऐतिहासिकपटाच्या कलाकार व तंत्रज्ञ यांनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली. साताऱ्याच्या कदम सरकार सापचा वाडा या ठिकाणी ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरू आहे.

‘फत्तेशिकस्त’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दिग्पाल लांजेकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, निखिल राऊत, हरीश दुधाडे, अजय पुरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, नक्षत्रा मेढेकर, रुची सवर्ण मोहन आणि हिंदी चित्रपट-मालिकांमधील प्रसिद्ध चेहरा अभिनेता अनुप सोनी यांसारखे मातब्बर कलाकार ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटात आहेत.