प्रियांका चोप्राच्या आगामी ‘काय रे रास्कला’चा टीझर प्रदर्शित

44

सामना ऑनलाईन । मुंबई

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘व्हेंटिलेटर’नंतर अभिनेत्री आणि निर्माती प्रियांका चोप्राने ‘काय रे रास्कला’ म्हणत तिच्या दुसऱ्या मराठी चित्रपटाचं पोस्टर नुकतंच लाँच केलं होतं. ‘व्हेंटिलेटर’ च्या भरघोस यशामुळे प्रियांकाची निर्मिती असलेला दुसरा मराठी चित्रपट नेमका कसा असेल, याची उत्सुकता सर्वांनाच होती. आता या उत्सुकतेवरचा पडदा दूर झाला असून खुद्द प्रियांकानेच या चित्रपटाचा टीझर आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे.

पर्पल पेबल पिक्चर्स निर्मित आणि गिरिधरन स्वामी दिग्दर्शित ‘काय रे रास्कला’ या चित्रपटात गौरव घाटणेकर आणि भाग्यश्री मोटे ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यात कॉमेडीचा आणखी तडका देण्यासाठी निखिल रत्नपारखी, सुप्रिया पाठारे आणि अक्षर कोठारी यांसारखे इतर अनेक कलाकार असणार आहेत.

कुनिका सदानंद या चित्रपटाच्या सहाय्यक निर्मात्या असून ‘काय रे रास्कला’ला रोहन-रोहन या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केलं आहे. डॉ. मधू चोप्रा आणि प्रियंका चोप्रा यांच्या पर्पल पेबल पिक्चर्स निर्मित “काय रे रास्कला” हा सिनेमा येत्या १४ जुलै ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे .

पाहा काय रे रास्कलाचा टीझर-

आपली प्रतिक्रिया द्या