18 वर्षाचा तरुण झाला गरोदर, डॉक्टरही पडले चाट

अमेरिकेत 18 वर्षाचा तरुण चक्क गरोदर राहिला आहे. गेले काही दिवस या तरुणाला आपल्या शरीरात विचित्र बदल जाणवू लागले, जेव्हा तो डॉक्टरकडे गेला तेव्हा डॉक्टरही चाट पडले.

मिरर या इंग्रजी दैनिकाने याबाबत वृत्त दिले आहे. मायकी चॅनेल हा तरुणाचा जन्म 2002 साली अमेरिकेत झाला होता. जन्मापूर्वी मायकीच्या पालकांनी सोनोग्राफी केली होती. तेव्हा पोटात मुलगी असल्याचे निष्पण्ण झाले होते. पण जेव्हा बाळाचा जन्म झाला तेव्हा तो मुलगा निघाला होता. त्यामुळे मायकीचे आई वडील आश्चर्यचकित झाले होते.

नंतर मायकीच्या पालकांनी त्याला मुलासारखे वाढवले. पण मायकी थोडा मुलींसारखा वागत होता. त्यामुळे शाळेतील मुले त्याला चिडवत पण होते. वयाच्या पाचव्या वर्षी खेळताना त्याने आईच्या पर्समधून लिपस्टिक काढली आणि ती लावली होती, तेव्हापासून मुलींसारखे नटायला त्याला आवडत होते. वयाच्या 13 व्या वर्षी आपण गे किंवा तृतीयपंथी असल्याचे मायकीला वाटत होते.

सगळे काही ठीक सुरू असताना मायकी रुटीन चेकअपसाठी डॉक्टरांकडे गेला. सेक्स केल्यानंतर मायकीला शौचालयास जाताना त्रास जाणवत होता. डॉक्टरांनी तपासणी केली असता एक विचित्र घटना समोर आली. मायकीच्या पोटात गर्भाशय आणि गर्भनलिका असल्याचे समोर आले.

आपल्याला लहान मुले फार आवडतात असे मायकीने सांगितले. जेव्हा अपल्या पोटात गर्भाशय असल्याच समोर आले तेव्ह मायकीने आई व्हायचा निर्णय घेतला. सरोगसी पद्धतीने मायकी गरोदर आहे.

मायकी सध्या चार महिन्यांची गरोदर आहे. जेव्हा आपण लहान होतो तेव्हा अपाल्या पालकांचा फार सहवास आपल्याला लाभला नाही अशी खंत मायकीने व्यक्त केली. आता आपण होणार्‍या बाळाला आईचे प्रेम देऊ अशी भावना मायकीने व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या