अंतर्वस्त्रातून करत होती अंमली पदार्थांची तस्करी; 19 वर्षांच्या तरुणीला अटक

अंतर्वस्त्रांतून अंमली पदार्थांची तस्करी करत त्याची विक्री करणाऱ्या एका 19 वर्षांच्या तरुणीला ब्राझीलमध्ये अटक करण्यात आली आहे. ती राहत असलेल्या हॉटेलमध्ये छापा टाकल्यावर पोलिसांना विविध प्रकारचे अंमली पदार्थ आढळले आहेत. या प्रकरणी तिच्या प्रियकरालाही अटक करण्यात आली आहे. आपली बहीण अंमली पदार्थ तस्करांच्या संगतीत होती, तिला तिच्या गैरकृत्याची शिक्षा मिळाली आहे, असे तरुणीच्या भावाने सांगितले. तिच्या भावाच्या या प्रतिक्रियेमुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे.

ब्राझीलच्या साओपॉलोमध्ये एका ठिकाणी 19 वर्षांची लॉरेन संशयास्पद स्थितीत फिरत असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी तिची झडती घेतली असता तिच्या अंतर्वस्त्रांमध्ये 6 कोकेनची आणि 15 क्रैक या अंमली पदार्थांची पाकिटे आढळली. त्यानंतर ती राहत असलेल्या हॉटेलात पोलिसांनी छापा टाकला. तिच्या खोलीत गांजाची 85 पाकिटे, कोकेनची 295 पाकिटे आणि क्रेक या अंमली पदार्थांची 8 पाकिटे आढळली. त्याचप्रमाणे 97 परफ्यूमच्या बाटल्या आणि 16 एक्सटेसी ड्रग्सच्या गोळ्याही आढळल्या आहेत. ती अंतर्वस्त्रातून या अंमली पदार्थांची तस्करी करून त्यांची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या हॉटेलच्या व्यवस्थापकाला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आपली बहीण गेल्या काही वर्षांपासून अंमली पदार्थ तस्करांच्या संगतीत होती. तिला तिच्या गैरकृत्याची शिक्षा मिळाली आहे, असे तिच्या भावाने सांगितले. सात वर्षांपूर्वी आमच्या वडिलांची गोळी मारून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर अपघाताने बहिण गुन्हेगारी क्षेत्रात गेली. तिचा अंमली पदार्थ तस्कर आणि गुन्हेगारांशी संपर्क वाढला. तिला आपण अनेकदा समजावले. पण वडिलांच्या हत्येचा तिच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता. त्यामुळे तिचे आयुष्यच बदलून गेले, असे तिच्या भावाने सांगितले.

या घटनेनंतर केलेल्या चुकीची तिला जाणीव होईल आणि ती पूर्वीसारखी जीवनाच्या मुख्य प्रवाहात येईल,अशी अपेक्षाही तिच्या भावाने व्यक्त केली. लॉरेनच्या भावाने सांगितलेल्या या गोष्टीमुळे पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला. एका घटनेमुळे सर्वसामान्य घरातील तरुणी अमंली पदार्थ तस्करी आणि त्याची विक्री करू लागली. त्यामुळे तिच्यासाठी अर्ज करणार असल्याचे तिच्या वकिलाने सांगितले. आपण अजून लॉरेनला भेटलेलो नाही. तिला भेटून तिच्या बाजून न्यायालयात अर्ज दाखल करणर असल्याचे तिच्या वकिलाने सांगितले. सध्या लॉरेल आणि तिचा प्रियकर पोलीस कोठडीत असून पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या