पोलिसावर युवकाचा चाकूहल्ला; पोलिसांच्या कारवाईत हल्लेखोर ठार

रशियामध्ये एका 16 वर्षांच्या युवकाने पोलिसावर चाकूहल्ला केल्याची घटना घडली आहे. पोलिसावर चाकू हल्ला केल्यानंतर त्याने पोलीस ठाण्याला आग लावण्याचाही प्रयत्न केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत पोलिसांनी युवकाला ठार केले आहे.

रशियाच्या टटारस्तान या मुस्लीमबहुल भागात शुक्रवारी एका 16 वर्षांच्या मुलाने एका पोलिसावर चाकूहल्ला केला. त्यानंतर त्याने पोलीस ठाण्याला आग लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने प्रत्युत्तरादाखल कारवाई करत युवकाला ठार केले. ही दहशतवादाची घटना असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दहशतवादी हल्ल्याच्या दृष्टीने शुक्रवारी पोलिसावर झालेल्या हल्ल्याचा आणि पोलीस ठाण्याला आग लावण्याच्या घटनेचा तपास करण्यात येत आहे. प्राथमिक माहितीवरून हा दहशतवादी हल्ला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तरुणाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिसाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हल्लेखार सायबेरियातील अल्टाई भागातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसावर हल्ला केल्यानंतर पोलीस ठाण्याला आग लावण्याच्या हेतूने त्याने दोन मोलोटोव कॉकटेल हे स्फोटक पदार्थ फेकल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस अधिकारी आल्यावर त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावर पोलीस अधिकाऱ्यांनी गोळीबार करून युवकाला ठार केले.

आपल्यावर हल्ला करण्यापूर्वी तरुणाने ‘अल्ला हू अकबर’ चा नारा दिल्याचे जखमी पोलिसाने सांगितले. हल्लेखोर एका कॅफेमध्ये काम करत होता. त्या कॅफेच्या मालकाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून अवैध शस्त्रास्त्रे बाळगणे, अवैध बांधकाम आणि तोडफोडप्रकरणी त्याला 14 वर्षांची शिक्षा झाली होती. या सर्व माहितीच्या आधारे हा दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या