तेजस एक्सप्रेसच्या प्रवाशांना रेल्वे प्रशासन देणार विनाशुल्क विमाकवच

454

तेजस एक्सप्रेस लखनऊ- नवी दिल्ली- लखनऊ या मार्गावर 4 ऑक्टोबर 2019 पहिल्यांदा सुरू  करण्यात आली. या एक्सप्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अहमदाबाद-मुंबई या मार्गावरही लवकरच तेजस एक्सप्रेस सुरू होणार आहे. या एक्सप्रेसमध्ये उत्तम खानपानाच्या सोयीसोबतच, सुरक्षा, हाऊसकिपींग आणि इन्फोटेनमेंटसारख्या सुविधाही पुरवण्यात येतात. त्यामुळे या एक्सेप्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता या एक्सप्रेसमधील प्रवाशांसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता विमा कवच देण्यात येणार आहे.

हे विमाकवच 25 लाख रुपयांचे असेल.प्रत्येक प्रवाशाला हे विमाकवच मिळणार आहे. त्यासोबतच प्रवासादरम्यान चोरी किंवा दरोड्याची घडना घडल्यास एक लाखाचे अतिरिक्त विमाकवचही असणार आहे. प्रवासादरम्यान अपघातात मृत्यू झाल्यास प्रवाशांच्या वारसांना 25 लाख रुपये मिळणार आहेत. तर कोणताही अवयव गमावावा लागल्यास 15 लाखांपर्यंतची रक्कम मिळणार आहे. तातडीने रुग्णालयातील उपचारांसाठी पाच लाखांपर्यंतची रक्कम मिळणार आहे. लिबर्टी जनरल इन्शुरन्स कंपनीकडून हे विमा कवच देण्यात येणार आहे.

विमाकवचासोबतच प्रवासदरम्यान एक्सप्रेसला एका तासाचा विलंब झाल्यास प्रवाशांना 100 रुपयांचा परतावा मिळणार आहे. तर एक्सप्रेसला दोन तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यास 250 रुपये परतावा मिळणार आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या