कंगना बनणार हवाई दलाची पायलट, वाचा सविस्तर बातमी

553

बॉलिवूडच्यी क्वीन कंगना रणौत तिच्या बेधडक वक्तव्यांइतकीच तिच्या दमदार चित्रपटांसाठी ओळखली जाते. कबड्डीपटूच्या आयुष्यावर बेतलेला पंगा हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे तिच्या नावाची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे. त्यातच ती आता हवाई दलातील पायलट होणार असल्याचंही वृत्त आहे.

दिग्दर्शक रॉनी स्क्रूवाला याच्या आगामी तेजस या चित्रपटात कंगना वायुदलाच्या पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे. एका मुलाखतीत तिने या वृत्ताचा खुलासा केला आहे. मला लहानपणापासूनच सैन्य दलांविषयी अमाप कौतुक आणि कुतुहल आहे. त्यामुळे मला कधीतरी एकदा सैन्य अधिकाऱ्याची भूमिका साकारावी, अशी इच्छा होती. त्यामुळे मी या चित्रपटाला होकार दिला, असं कंगनाचं म्हणणं आहे.

या चित्रपटाद्वारे सैन्यदलात महिलांचा सहभाग अधोरेखित होणार असल्याचंही कंगनाचं म्हणणं आहे. या चित्रपटासाठी कंगनाला खडतर सैनिकी प्रशिक्षण घ्यावं लागेल. या चित्रपटाचं चित्रीकरण जुलै महिन्यापासून सुरू होईल. रॉनी स्क्रूवाला यांच्य सोबत कंगना काम करायला फारच उत्सुक आहे.

सध्या प्रदर्शित झालेल्या पंगा या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असून, समीक्षकांकडून चित्रपटाचे चांगले कौतुक होत आहे. चित्रपटात जस्सी गिल, नीना गुप्ता यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट अश्विनी अय्यर तिवारी यांनी दिग्दर्शित केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या