दारु प्यायल्यानंतरच झाला तेजसाचा घात, सिंहगड पोलिसांचा संशय

1757
tejasa-payal-beed-pune

मित्रांसमवेत दारू आणि हुक्क्याचे सेवन केल्यानंतर घरातच उच्चशिक्षित तरुणी तेजसाचा घात झाल्याचा संशय सिंहगड पोलिसांनी व्यक्त केला आहे. मद्यपार्टी केल्यानंतर तिन्हीही मित्रांनी तेजसा राहत असलेल्या घराला बाहेरुन कुलूप लावून मोटारीतून पळ काढल्याचे निषन्न झाले आहे. त्यामुळे दारु आणि हुक्क्याचे सेवन केल्यानंतरच तेजसाचा घात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

तेजसा शामराव पायाळ (वय 29, रा. रामकृष्ण सोसायटी, माणिकबाग) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. ही घटना सोमवारी (दि.2 ) दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली होती. त्यानुसार सिंहगड पोलिसांनी पीयूष नितीन संचेती (वय 34, रा.तुळशीबागवाले कॉलनी), वसंतकुमार प्रभाकर गौडा (वय 31, रा. बंगलोर), सोनल सुनिल सदरे (वय 29,रा.आंबेगाव, मूळ- नगर) यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना 10 डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.

पबमध्ये झाली होती मैत्री
पुण्यात नोकरीच्या शोधात असताना तेजसा आणि सोनल सदरे यांची ओळख झाली होती. तर पीयूष संचेतीचा मिनरल वॉटर बॉटल वितरणाचा व्यवसाय असून त्याची पबमध्ये ओळख झाली. यानंतर तिघांनी मिळून अनेकदा एकत्र पाट्र्या केल्या. वसंतकुमार गौडा हा पीयूषचा मित्र असून तो एका नातेवाईकाच्या लग्नासाठी बंगलोरवरुन पुण्यात आला होता.

पीयूषने 30 डिसेंबरला वसंकुमार आणि सोनलला तेजसाच्या घरी पार्टी करण्यासाठी बोलवणे होते. पार्टीमध्ये चौघांनीही दारू आणि हुक्क्याचे सेवन केले. त्यानंतर त्यांच्यात वादावादी झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, तेजसाचा खून का करण्यात आला हे अद्यापही पोलिसांना कळू शकले नाही. जबाबामध्ये तिन्ही आरोपींमध्ये विसंगती आढळून येत असल्याने पोलीस कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहचले नाहीत.

आपली प्रतिक्रिया द्या