बिहार तापाने फणफणला, लालूपुत्र वर्ल्डकपला?

67
rabri-devi-tejashwi-yadav

सामना ऑनलाईन । पाटणा

बिहारमध्ये मेंदूज्वराने अक्षरश: थैमान घातले असून मागील 14 दिवसांत तब्बल 139 बालके या आजाराने दगावली. प्रशासन आणि राज्य सरकारच्या कामावर बिहारचे नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला विधानसभेचे विरोधीपक्ष नेते, लालू प्रसाद यांचे पुत्र तेजस्वी यादव हे बिहारमध्ये दिसत नसल्याने नागरिक बुचकळ्यात पडले आहेत. विशेष म्हणजे तेजस्वी यादव हे वर्ल्डकप पाहण्यासाठी इंग्लंडमध्ये गेल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जनतेचा आवाज कोण उचणार असा प्रश्न विरोधी पक्षांच्या नेत्यांना विचारला जात आहे.

मेंदूज्वराच्या आजाराला आळा घालण्यात प्रशासन अपुरे पडल्याने मंगळवारी पालकांच्या भावनांचा उद्रेक झाला आहे. याचदरम्यान विरोधीपक्ष नेते तेजस्वी यादव कुठे आहेत या प्रश्नाचे उत्तर देताना राजदचे नेते रघुवंश प्रसाद सिंह यांनी आपल्याला निश्चित माहीत नाही, मात्र ते वर्ल्डकपचे सामने पाहण्यासाठी गेले असतील, अशी शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी विरोधी पक्ष नेत्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या