
तेलंगणा येथे अजब घटना समोर आली आहे. बस पंडक्टरने बसमध्ये प्रवास करणाऱया काsंबडय़ाचे चक्क तिकीट कापले आहे. या घटनेची चांगलीच चर्चा रंगली आहे.
तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमध्ये प्रवास करण्यासाठी एका काेंबडय़ाचे 30 रुपये आकारले. तेलंगणातील करीमनगर जिह्यात मंगळवारी ही घटना घडली. बस पंडक्टर जी. तिरुपती यांना पेद्दापल्ली ते करीमनगरच्या प्रवासादरम्यान एका प्रवाशाने कापडात गुंडाळलेला काsंबडा लपवल्याचे दिसले. काsंबडा दिसताच पंडक्टरने तत्काळ त्याचे तिकीट फाडले. प्रवासी मोहम्मद अली यांनी तिकिटाचे पैसे द्यायला विरोध केला. जी. तिरुपती यांनी आरटीसी बसमधील सर्व सजीव वस्तूंचे शुल्क आकारले जाते, असे सांगत प्रवासी मोहम्मद अली यांना 30 रुपये देण्यास सांगितले. दोघांमध्ये वाद झाला. पंडक्टरने आग्रह केल्यावर प्रवाशाने काsंबडय़ाचे तिकीटाचे पैस दिले.
टीएसआरटीसी अधिकाऱयांनी या घटनेची दखल घेतली आहे. टीएसआरटीसी गोदावरीखानी डेपो मॅनेजर व्ही. व्यंकटेशम म्हणाले की, पंडक्टरने प्रवाशाला काsंबडय़ासह खाली उतरण्यास सांगितले पाहिजे होते, कारण टीएसआरटीसी नियमांनुसार बसमध्ये प्राण्यांना परवानगी नाही. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पंडक्टरकडून स्पष्टीकरण मागवले जाईल.