
अलीकडच्या काळात कमी वयात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तेलंगणामध्ये गेल्या 1-2 महिन्यांपासून तरुण आणि विद्यार्थी अचानक हृदयविकाराच्या झटक्याने बळी पडण्याच्या घटना घडत आहेत. अशीच एक घटना शुक्रवारी पहाटे घडली असून एका 13 वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महबूबाबाद जिल्ह्यातील मरीपेडा मंडळातील अब्बापलेम गावात ही धक्कादायक घटना घडली . बी श्रावंथी असे या मृत्युमुखी मुलीचे नाव असून इयत्ता सहावीत शिकत आहे. बी श्रावणाथी ही आपल्या आईवडील आणि दहावीत शिकणाऱ्या भावासोबत राहत होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, बी श्रावंथीला गुरुवारी रात्री झोपल्यानंतर काही तासांनी 12.30 वाजता जाग आली. श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर तिने आजीला छातीत दुखत असल्याचे सांगितले. कुटुंबातील सदस्यांना तिला डॉक्टरांकडे नेण्यासाठी वाहन मिळेपर्यंत, रात्री 1 च्या सुमारास तिचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. तसेच मुलीच्या काकांनी तिला सीपीआर देऊन पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला वाचवता यश आले नाही. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी तिची प्राण ज्योत मालवली.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी श्रावंथी आपल्या मैत्रिणींसोबत खेळत होती. शुक्रवारी अचानक सकाळी तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला तिने आपल्या आजीला त्रास होत असल्याचे सांगितले. त्याचदरम्यान श्रावणाथी कोसळली आजीने त्वरीतच लकपती यांना माहिती दिली. सीपीआर केल्यानंतर त्यांनी मुलीला रुग्णालयात हलवले. मात्र, रुग्णालयात डॉक्टरांनी श्रावंतीला मृत घोषित केले.