टेलिकॉम कंपन्या दिवाळखोरीत निघाल्यास बँका अडचणीत येणार!

727

व्होडाफोन-आयडिया, एअरटेलसारख्या टेलिकॉम कंपन्यांनी थकविलेल्या 1.47 लाख कोटी रुपयांच्या समायोजित सकल महसूल (एजीआर) प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर दूरसंचार मंत्रालयानेही कारवाईच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. मात्र, टेलिकॉम कंपन्यांनी दिवाळखोरी जाहीर केली तर स्टेट बँकेसह (एसबीआय) महत्त्वाच्या बँका अडचणीत येण्याचा धोका आहे. पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो.

न्यायालयाने आदेश देऊनही टेलिकॉम कंपन्यांकडून 1.47 लाख कोटींची थकबाकी दूरसंचार मंत्रालयाला दिली जात नाही यावरून शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने प्रचंड संताप व्यक्त केला. हिंदुस्थानात कायदा नाही, देश सोडून जावेसे वाटते, असे खडे बोल न्यायमूर्तींनी सुनावले. त्यानंतर दूरसंचार खात्याने टेलिकॉम कंपन्यांना आदेश बजावून शुक्रवारीच रात्री 12च्या आत थकबाकी जमा करा, असे आदेश दिले होते. पण टेलिकॉम कंपन्या थकबाकी जमा करू शकल्या नाहीत.

आपली प्रतिक्रिया द्या