मुंबईसह राज्यभर थंडीचं आगमन

21

सामना ऑनलाईन । मुंबई

ओखी वादळानंतर मुंबईसह राज्यभरात तापमानाचा पारा घसरला आहे. अनेक ठिकाणी धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळत आहे. ज्या थंडीची लोक आतुरतेनं वाट पाहत होते, तिचं आगमन झाल्याने लोक सुखावले आहेत. विदर्भातील काही भागात किमान तापमान १४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे तर मुंबईत शुक्रवारी १८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली.

विदर्भात ब्रह्मपुरीमध्ये १४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली तर नागपूर, वर्धा, यवतमाळमध्ये १६ अंश, बुलडाणा, चंद्रपूरमध्ये १८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. महाबळेश्वर व नाशिकमध्ये किमान तापमान १६ अंशापर्यंत खाली आले आहे. मुंबईतही थंडीची लाट पसरली आहे. सांताक्रूझ वेधशाळेत किमान १८ अंश सेल्सिअस, तर कुलाबा वेधशाळेने किमान तापमान २०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मुंबई शहरापेक्षा उपनगरात थंडीचा जोर अधिक आहे. पुढील २४ तासात किमान तापमान सरासरी २० अंश सेल्सिअस राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या