मंदिराच्या क्लार्कला 12 कोटींची लॉटरी, एका रात्रीत परिस्थिती बदलली

‘अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने’ अशी अवस्था एका मंदिराच्या क्लार्कची झाली आहे. कोच्ची येथील 24 वर्षाच्या अनंतु विजयन यांना 12 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. अनंतु विजयन हे कोच्ची एका मंदिरात क्लार्क आहेत. त्यांनी माहिती दिली की, मी ओणम बंपर लॉटरीचे 300 रुपयाचे तिकीट खरेदी केले होते. ज्यामध्ये टॅक्स कापल्यानंतर 7.5 कोटी रुपये मिळतील.

हिंदी वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार अनंतु यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. कुटुंब चालवण्यात त्याला बऱ्याचदा अडचणी येत होत्या. त्यांचे वडील पेंटर आहे आणि बहीण एका खासगी कार्यालयात अकाऊंटंट होती. मात्र लॉकडाऊन दरम्यान बहिणीची नोकरी गेली.

अनंतु यांचे म्हणणे आहे की, वडिलांचे कामही या दिवसात फारसे सुरू नाही. मात्र रविवारी रात्री केरळ सरकारने ओणम बंपर लॉटरी 2020 निकाल जाहीर केले आणि 12 कोटी रुपयांची लॉटरी लागल्याचे समजले. आमचे जीवनच बदलून गेले.

इतक्या मोठ्या प्रमाणात मिळालेल्या रकमेचे काय करणार? यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही, असे अनंतु यांनी सांगितले. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव रक्कम बँकेत ठेवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या