अंधेरीच्या श्री मां अंबाजी मंदिराचा जीर्णोद्धार

श्री कोटेश्वर नगर अंबाजी मंदिराचा जीर्णोद्धार आणि पुनःप्रतिष्ठापना समारंभ बुधवारपासून अंधेरीच्या कोटेश्वर नगरमध्ये दणक्यात सुरू झाला आहे. १९ ते २१ एप्रिलपर्यंत सकाळी ८ ते १२ आणि दुपारी ३ ते ६ वाजेपर्यंत भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. या सोहळ्यात मोठ्या हर्षोल्लासात मां अंबाजीची पुनःप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या समारंभाला मातेच्या सर्व भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मंदिर व्यवस्थापनाने केले आहे.

पहिल्या दिवशी बुधवारी १९ एप्रिल रोजी देह शुद्धी म्हणून श्री गणेशपूजा करण्यात आली. यावेळी जलयात्रा कलश पूजन, स्वस्तीवाचन कुलदेवी-मातृक पूजन, पितृपूजा करण्यात आली असून नवग्रहांच्या शांतीसाठी अग्निदेवाची पूजाअर्चा करण्यात आली. आज गुरुवारी दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा गणेशाची पूजा करण्यात येणार असून दुपारी ४ वाजता श्री मां अंबाजी यांच्याबरोबर सर्वच देवांची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यावेळी आरती, प्रसाद हेही होणार आहे. अखेरच्या दिवशी सायंकाळी ७ ते १० वाजेपर्यंत महाप्रसादाच्या भंडाऱयाचे आयोजन करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या