टेंम्पोच्या धडकेत दुकाचीस्वार जागीच ठार

48

सामना प्रतिनिधी । कासार शिरसी

निलंगा तालुक्यातील कासार सिरसी निलंगा रस्त्यावरील हासोरी येथे शनिवारी दुपारी टेंम्पो व मोटार सायकलचा अपघात झाला. यात मोटार सायकलस्वार जागीच ठार झाला, तर एक जण जखमी झाला आहे. संभाजी ऊर्फ प्रदिप पाटील (३० रा. त्रिकोळी ता. उमरगा) असे मृताचे नाव आहे, तर केदारनाथ पाटील (४० रा. त्रिकोळी ता. उमरगा) हा जखमी झाला आहे. या प्रकारणी विकास पाटील रा. त्रिकोळी यांनी दिलेल्या फिर्यादिवरून टेंम्पो चालक गोपाळ खैरे रा. हासोरी खु. यांच्या विरुध्द कासार शिरसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास स.पो.नि. बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार समाधान कवडे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या