दोन दिवसांत उकाडा कमी होणार

सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्यातील नागरिकांची येत्या दोन दिवसांत उकाड्यापासून सुटका होणार आहे. तापमानाचा चढलेला पारा दोन दिवसांत खाली घसरेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या गरम वाऱ्यांनी दिशा बदलल्याने तापमान कमी होईल अशी माहिती हवामान खात्याचे संचालक व्ही. के. राजीव यांनी दिली. गेल्या ३० वर्षांतील सर्वाधिक ४४ डिग्री सेल्सियस इतके तापमान विदर्भातील अकोला जिह्यात नोंदले गेले. सर्वसाधारण तापमानापेक्षा ते ५.३ डिग्री सेल्सियस जास्त होते.

वर्धा ४३.६, नागपूर ४३.३ आणि अमरावतीमध्ये ४३ डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील पुणे, जळगाव, नगर, नाशिक, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिह्यात कमाल तापमानापेक्षा किमान तापमानात वाढ झाल्यामुळे रात्रीच्या वेळीही उकाडा जाणवला.

आपली प्रतिक्रिया द्या