मराठवाडा गारठला, दोन दिवसात तापमान आणखी घसरण्याची शक्यता

17

विजय जोशी,नांदेड

मराठवाड्यामध्ये थंडीने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली असून इथल्या प्रमुख शहरांमध्ये तापमान घसरायला लागलं आहे. आज सकाळी साडेआठ वाजता संभाजीनगरचे तापमान १३.२ डिग्री सेल्सियस तर नांदेडचे तापमान १३ डिग्री सेल्सियस इतके नोंदवण्यात आले आहे. भारताच्या वायव्येकडून थंड वारे वाहायला लागल्याने महाराष्ट्रातील तापमानात घट व्हायला सुरुवात झाल्याचं खगोलशास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी सामनाशी बोलताना सांगितले आहे.

येत्या दोन दिवसात वायव्येकडून येणाऱ्या थंड वारे आणखी तीव्र होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र गारठण्याची शक्यता आहे. खासकरुन विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान झपाट्याने खाली येईल असं सांगितलं जात आहे.

मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात गुरुवारी आणि शुक्रवारी अवकाळी वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या मनात या वृत्तामुळे धडकी भरली आहे. शेतकऱ्यांच्या हाती थोडा वेळ असून त्यांना त्यांच्या पिकांची, शेतमालाची योग्य ती काळजी घेण्यासाठी धवपळ करावी लागणार आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या