राजस्थानमध्ये कोरोना संकटात दहा हजार लग्न, प्रशासनाची डोकेदुखी वाढली

राजस्थानमध्ये कोरोनाचे संकट वाढत आहे. मंगळवारी राज्यात 3 हजार 314 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या अडीच लाखांच्यावर गेली आहे. तर राजधानी जयपूरमध्ये गेल्या 24 तासात सर्वाधिक 656 रुग्ण सापडले आहेत. कोरोना संकट असताना जयपूरमध्ये चार हजार लग्न होऊ घातली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

आज जयपूरमध्ये भरपूर लग्न आहेत. या लग्नांना अबूझ सावा म्हणतात. म्हणजेच या काळात लग्नासाठी कुठलाही मुहुर्त पाहण्याची गरज नाही. या सराईत चार हजार लग्न होणार आहेत. तर संपूर्ण राज्यात 10 हजार लग्न होणार आहेत. त्यामुळे प्रशासन आणि राज्य सरकारची डोकेदुखी वाढली आहे. या लग्नांमध्ये कोरोना टाळण्यासाठी नियमांचे पालन व्हावे यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.

मुख्यमंत्री आणि राज्यपालांचे आवाहन

राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि राज्यपाल कलराज मिश्र यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की लग्नात फार गर्दी करू नका, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा आणि मास्क आवर्जून घाला.  राजस्थानमध्ये लग्नात 100 जणांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास त्यावरील दंडाची रक्कमही वाढवण्यात आली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या