क्वारंटाईनवेळी केस धुण्यासाठीही कोणी नव्हते, अजब विधानामुळे टेनिस स्टारची गर्लफ्रेंड ट्रोल

टेनिस स्टार बर्नाड टॉमिकची गर्लफ्रेंड एका अजब विधानामुळे चर्चेत आली आहे. टॉमिक सध्या ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येथे आला असून त्याच्यासोबत त्याची गर्लफ्रेंड वेनेसा सिएरा (Vanessa Sierra) ही देखील आहे. मात्र क्वारंटाईन नियमांमुळे ती निराश झाली आहे.

वेनेसा सिएरा (Vanessa Sierra) हिने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ऑस्ट्रेलियात क्वारंटाईन नियम एकदम कडक करण्यात आलेले असून यामुळे ती निराश झाली आहे. क्वारंटाईन नियमांमुळे मला माझे केसही निट धुता आले नाहीत, असे विधान तिने केले आणि ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली.

ती म्हणते, क्वारंटाईन होणे सर्वात वाईट गोष्ट आहे. मी आजपर्यंत माझे केस स्वत: धुतलेले नाहीत. हेअर ड्रेसर आठवड्यातून दोनदा माझे केस धुतात, मात्र आता क्वारंटाईन नियमांमुळे मला विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागतोय. यासह तिने आणखीही काही गोष्टी आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून फॅन्सपर्यंत पोहोचवल्या आहेत.

ज्या हॉटेलमध्ये ती राहते तिथले जेवण फारच वाईट असल्याची तक्रार वेनेसा सिएरा (Vanessa Sierra) हिने केली आहे. तसेच माझी खोली देखील साफ करण्यात येत नाही आणि स्वच्छ चादरही मिळत नाही. यासह माझ्या उष्ट्या प्लेट्स देखील मलाच साफ कराव्या लागताहेत अशी तक्रारही तिने केली.

vanessa-sierra-1

दरम्यान, वेनेसा सिएरा (Vanessa Sierra) हिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तिला ट्रोल करण्यात येत आहे. मात्र ट्रोलर्सला उत्तर देताना तिने मी कोरोना विषाणू महामारीच्या काळात हजारो डॉलर्स दान दिल्याचे सांगितले. तसेच मला माझ्या केसांवरून ट्रोल केले जात असले तरी मला त्याची पर्वा नाही. जगात अशी अनेक मूर्ख लोक आहेत, असे ती आपल्यावर निशाणा साधणाऱ्या ट्रोलर्सला म्हणते.

आपली प्रतिक्रिया द्या