वजन कमी करायचं आहे? मग सानिया मिर्झा काय म्हणते ते वाचा

4101
sania-mirza

आई झाल्यानंतर हिंदुस्थानची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा लवकरच मैदानावर उतरण्यास उत्सुक आहे. तिने सोशल मीडियावरून तशा आशयाची एक पोस्टही टाकली आहे. टेनिसच्या कोर्टवर परतण्यासाठी तिने चार महिने आधीपासूनच प्रयत्न सुरू केले होते आणि चिकाटीने ती त्यात यशस्वी होत असल्याचे दिसत आहे. आपल्या शरीराची तुलना करणारे दोन फोटो सानियाने सोशल हँडवर पोस्ट केले आहेत. यावेळी तिने आपल्या वजनात फरक पडल्याचा उल्लेख देखील केला आहे. बाळंतीण झाल्यावर तिचे वजन 89 किलो पर्यंत पोहोचले होते. तर आता चार महिन्यात तिने 63 किलोपर्यंत वजन कमी केले आहे.

सानियाने सोमवारी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चाहत्यांसोबत ही बाब शेअर केली. तिने बाळंतीण झाली त्यानंतरचा फोटो आणि चार महिने वजन कमी करण्यावर घेतलेल्या मेहनतीनंतरचा फोटो असे दोन फोटो पोस्ट केले. ज्यामध्ये ती अगदी पूर्ववत दिसत आहे. इतकेच नाही तर तिने असे म्हटले आहे की, जर मी हे करू शकते तर कुणी देखील करू शकतं’. यावेळी ’89 किलो विरुद्ध 63′ अशी कॅप्शन देखील तिने वापरली आहे.

‘आपल्या सर्वांसमोर ध्येय असतात… काही ध्येय आपण त्वरित गाठू अशी असतात तर काही दीर्घकालीन… त्या प्रत्येकाबद्दल आपल्याला अभिमान असतो. आई बनल्यानंतर वजन पूर्ववत करण्याचे ध्येय गाठण्यासाठी मला चार महिने लागले.

‘मैदानात उतरण्यासाठी, फिटनेसचा सर्वोच्च स्तर गाठण्यासाठी बराच काळ गेला पण मी ते लक्ष्य प्राप्त केले. आपल्या स्वप्नांना साकार करा. ईश्वर जाणतो की, तुमच्याकडून हे शक्य नाही, असे सांगणारे अनेक लोक हे तुमच्या आसपास असतात. पण मी जर हे करू शकते तर कुणीही करू शकतं’, असे सानियाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या