भयंकर! शेअर रिक्षात गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

38

सामना ऑनलाईन। गुरुग्राम

देशभरात दिवसेंदिवस महिला व अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच दिल्लीजवळील गुरुग्राम येथे माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. रुग्णालयात नियमित तपासणी करुन शेअर रिक्षेने निघालेल्या एका सहा माहिन्याच्या गर्भवती माहिलेवर रिक्षातच तीन जणांनी सामूहिक बलात्कार केला. पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेनंतर तिघेही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

पीडित महिलेला दोन वर्षाचा मुलगा असून ती दुसऱ्यांदा गर्भवती आहे. २१ मे रोजी ती पतीबरोबर सायकलवरून रुग्णालयात नियमित तपासणीसाठी गेली होती. पण सायकलवर आपल्याला अवघडल्यासारखे वाटल्याचे तिने पतीला सांगितले. यामुळे पतीने रुग्णालयातून येताना तिला शेअर रिक्षात बसवले व तो सायकलने पुढे गेला. रिक्षात चालकासह तीन जण होते. महिला गर्भवती असल्याचे बघून त्यातील एकाने तिला पाणी पिण्यास दिले. ते सभ्य पुरुष असावेत असे समजून ती ते पाणी प्यायली. पण पाणी पिताच ती बेशु्द्ध पडली. त्यानंतर तिघा नराधमांनी तिच्यावर अत्याचार केले व तिला रस्त्यावर फेकले. शुद्धीत आल्यानंतर महिला घरी गेली व तिने सगळा प्रकार पतीस सांगितला. पत्नीवर झालेल्या अत्याचारामुळे व्यथित झालेल्या पतीने तिला पोलिसात तक्रार नोंदवण्यास सांगितले. पण महिलेची मानसिक अवस्था स्थिर नसल्याने तीन दिवसांनी त्यांनी पोलिसात याबदद्ल तक्रार नोंदवली.

आपली प्रतिक्रिया द्या