कश्मीर: शोपियामध्ये दहशतवाद्यांचा पोलिसांवर ग्रेनेड हल्ला

12

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू-कश्मीरमध्ये शोपिया जिल्ह्यातील इमम साहब येथे गस्तीवर असणाऱ्या पोलिसांवर दहशतवाद्यांनी ग्रेनेडने हल्ला केला आहे. हल्ल्यामध्ये जीवितहानी झाली नसल्याची माहिती एनएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

याआधी पुलवामा जिल्ह्यात लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीमध्ये दोन जवान शहीद झाले होते, तर एका दहशतवाद्याला ठार करण्यात यश आले होते. पंपोरमधील सामबोरा गावात दहशवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी शोधमोहीम सुरू केली होती. यादरम्यान ही चकमक उडाली होती. तर, अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ५ जवान जखमी झाले होते. सीआरपीएफच्या ९६व्या बटालियनच्या जवानांचे पथक मत्तान शहराकडे परत येत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या