कुख्यात दहशतवादी मसूद अजहर पाकिस्तानातून फरार?

2309

दहशतवाद्यांचं आश्रयस्थान बनलेल्या पाकिस्तानमधून दोन कुख्यात दहशतवादी फरार झाल्याचं वृत्त आहे. यातील एक दहशतवादी म्हणजे जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर असून दुसऱ्या दहशतवाद्याचं नाव एहसानुल्ला एहसान असं आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पॅरिस येथे फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सची बैठक रविवारपासून सुरू होत आहे. त्यात पाकिस्तानचं नाव काळ्या यादीत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून ही खेळी खेळण्यात आल्याचं बोललं जात आहे. पाकिस्तानने मसूद अझहर आणि त्याचं कुटुंब बेपत्ता असल्याचं म्हटलं आहे. गेल्याच वर्षी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी अजहर हा गंभीर आजारी असल्याचं विधान केलं होतं. त्यानंतर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेनेही त्याचा 2 मार्च रोजी मृत्यू झाल्याचं म्हटलं होतं.

अजहरसोबत अजून एक दहशतवादी फरार झाला आहे. एहसानउल्लाह एहसान नावाचा हा दहशतवादी 2012मध्ये मलाला युसुफजाई आणि 2014मधील पेशावर येथील शाळेवर झालेल्या हल्ल्यातील मुख्य आरोपी आहे. एहसानउल्लाहने 2017मध्ये दहशतवादी कारवायांसाठी त्याला हिंदुस्थानी गुप्तचर यंत्रणा रॉचं सहकार्य मिळतं, असं खळबळजनक विधान केलं होतं. हे दोन्ही दहशतवादी पळून गेल्याचा दावा पाकिस्तानने केला असून त्यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या