ट्विटरवर एलन मस्क नंबर वन; ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स

टेस्लाचे सीईओ आणि ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांनी नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि प्रसिद्ध गायक जस्टिन बिबर यांना मागे टाकत एलन मस्क ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारे व्यक्ती ठरले आहेत. एलन मस्क यांच्या फॉलोअर्सची संख्या 133,091,575 इतकी असून सध्या ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्सच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर बराक ओबामा असून त्यांचे
ट्विटरवर 133,042,221 इतके फॉलोवर्स आहेत. 113 दशलक्ष ट्विटर फॉलोअर्ससह जस्टिन बिबर तिसऱया तर 108 दशलक्षपेक्षा जास्त फॉलोअर्ससह कॅटी पेरी चौथ्या क्रमांकावर आहेत. एलन मस्क यांनी 44 अब्ज डॉलरमध्ये ट्विटरची खरेदी केली होती. ट्विटर ताब्यात आल्यानंतर त्यांनी एकापाठोपाठ एक अनेक धाडसी निर्णय घेतल्यामुळे सातत्याने ते चर्चेत राहिले.