टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा एलन मस्क यांच्या पगारात आता भरमसाट पगारवाढ होणार आहे. टेस्लाच्या शेअरधारकांनी सीईओ एलन मस्क यांच्या 56 बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 4.67 लाख कोटी रुपयांच्या सॅलरी पॅकेजला मंजुरी दिली आहे. ही अमेरिकेच्या कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठी रक्कम आहे. याआधी कोणत्याही सीईओला इतकी मोठी रक्कम मिळाली नाही. टेस्ला ही अमेरिकेतील इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी आहे. हिंदुस्थानात टेस्लाच्या कारची एन्ट्री करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मस्क हे जगातील सर्वात टॉप 5 श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आहेत. त्यांची एकूण संपत्ती 207 बिलियन डॉलर आहे. काही मोठय़ा संस्थात्मक गुंतवणूकदार आणि प्रॉक्सी फर्म यांचा विरोध डावलून टेस्लाच्या शेअरधारकांनी मस्क यांच्या सॅलरी पॅकेजला मंजुरी दिली. ज्या वेळी मंजुरी दिली जात होती, त्या वेळी या बैठकीला एलन मस्क हेसुद्धा उपस्थित होते.