कसोटीतील पाच ‘कासवछाप’ फलंदाज, दुसरे नाव वाचून तुम्हालाही बसेल शॉक

3715

क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात फलंदाज आणि गोलंदाजांची ‘कसोटी’ टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक पाहिली जाते. येथे खेळाडूचे तंत्र, संयम आणि धैर्याची परीक्षा होत असते. यामुळे अनेक खेळाडू या परीक्षेत खरे उतरत नाहीत. कसोटी क्रिकेटमध्ये अनेक खेळाडूंनी दमदार फलंदाजी करत कारकीर्द गाजवली, मात्र मोक्याच्या क्षणी, सामना वाचवण्यासाठी खेळाडूंना संथ खेळ करावा लागतो. आज आपण कसोटी क्रिकेटमधील सर्वात कासवछाप खेळीची आणि खेळाडूंची माहिती घेणार आहोत.

1. राहुल द्रविड
टीम इंडियाचा ‘वॉल’ राहुल द्रविड मैदानावर शड्डू ठोकून फलंदाजी करण्यात माहीर होता. 2007 ला इंग्लंडविरुद्ध द्रविडने 96 चेंडूंचा सामना करताना 12 धावा केल्या होत्या. हा सामना अनिर्णित राहिला होता.

2. एबी डिव्हीलिअर्स
दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हीलिअर्स आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. मैदानावर चौफेर फलंदाजी करण्यात त्याचा हातखंडा होता. मात्र याच एबी याने 2015 ला हिंदुस्थानविरुद्ध दिल्ली कसोटीत 244 चेंडूत 25 धावा करत मैदानावर नांगर टाकला होता. यावेळी एबीचा स्ट्राईक रेट फक्त 10 होता.

3. हनीफ मोहम्मद
पाकिस्तानचा माजी खेळाडू हनीफ मोहम्मद याने 1954 ला इंग्लंड विरुद्ध लोर्डस मैदानावर 223 चेंडूंचा सामना करत फक्त 20 धावा केल्या होत्या. या खेळी दरम्यान हनीफ यांचा स्ट्राईक रेट होता फक्त 9. हा सामना अनिर्णित राहिला होता.

4. ज्योफ एलॉट
न्यूझीलंडचा फलंदाज ज्योफ एलॉट याचेही नाव या यादीत आहे. 1999 ला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 11 व्या नंबरवर फलंदाजीला आलेल्या ज्योफ एलॉट याने 76 चेंडूंचा सामना केला, मात्र त्याने एकही रन बनवला नाही. अखेर कॅलिसच्या गोलंदाजीवर तो बाद झाला.

5. यशपाल शर्मा 
हिंदुस्थानचे माजी खेळाडू यशपाल शर्मा यांनी 1981 ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध 157 चेंडूत 13 धावा केल्या होत्या. यावेळी त्यांचा स्ट्राईक रेट होता फक्त 8. मात्र यशपाल यांच्या या संथ खेळीमुळे हिंदुस्थानला हा सामना अनिर्णित राखण्यात यश आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या