Video गाण्याच्या आवाजाने शेजारी वैतागला, केला ‘ड्रोन हल्ला’

129

सामना ऑनलाईन। टेक्सास

देश असो वा परदेश प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या कारणावरून शेजाऱ्याला त्रासलेला असतो. हा त्रास कधी शेजाऱ्याने दरवाजासमोर कचरा टाकल्याचा असतो तर कधी त्याच्या घरातून येणाऱ्या लाऊड म्युझिकचा. यावर आपण शेजाऱ्याबरोबर वाद घालतो. त्याला समज देतो आणि पुन्हा विसरतो. पण अमेरिकेतील टेक्सासमध्ये शेजाऱ्यांच्या घरातून कानठळ्या बसवणाऱ्या गाण्यांचा आवाज येत असल्याने दुसऱ्या शेजाऱ्याने त्या घरावर बाह्या चढवून शिवीगाळ करत नाही तर चक्क ड्रोनने हल्ला केल्याची अजब घटना घडली आहे.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 33 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये एक ड्रोन हवेत तरंगत फटाक्यातील पेटते बाण एका घरावर टाकत असल्याचे दिसत आहे. तर या ड्रोन हल्ल्याला घाबरून काहीजण रस्त्यावर धावत असल्याचेही यात दिसत आहे. सोशल मीडियावर हजारो यूजर्सनी हा व्हिडीओ बघितला आहे. तसेच अडचणींना तोंड देण्याचा हा नवीन ट्रेंड असल्याचे काहीजणांच म्हणणं आहे. तर काही जणांनी शेजाऱ्यांविरोधातील युद्ध असे नाव या व्हिडीओला दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या