फिटनेसप्रेमींसाठी ‘इंडिगो’चे टीजी कनेक्ट

12

सामना ऑनलाईन, मुंबई

सर्वसामान्य फिटनेस प्रेमी व युवा क्रीडापटूंना उत्तम फिजिक आणि आरोग्यदायी जीवनपद्धती अंगिकारण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ‘इंडिगो’ एअरलाइन्सने ‘फिट टू फ्लाय’ उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत इंडिगोने मुंबईत ‘टीजी कनेक्ट’ हे शारीरिक फिटनेसवर आधारीत चर्चासत्र आयोजित केले होते.

या चर्चासत्रात ‘मॉडेल’ शरीरसौष्ठवपटू साहिल खान, बॉलीवूडपटू सलमान व अनुष्का शर्माला ‘दंगल’ चित्रपटासाठी प्रशिक्षण देणारा राष्ट्रीय कुस्तीपटू जगदीश कालिरमण, अभिनेता व मि. वर्ल्ड २०१५ ठाकूर अनुपसिंग, दोन वेळचा ‘आयर्नमॅन’ ट्रायथलॉन विजेता अभिष्क मिश्रा व ‘इंडिगो’चे व्होल टाइम डायरेक्टर आणि चेअरमन आदित्य घोष यांनी मुंबईकरांना फिटनेस राखण्यासाठी प्रेरणा देणारे अनुभव सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या