उत्तर प्रदेशच्या लाडूचे हिमाचल प्रदेशमध्ये कौतुक

अभिनेते आशिष विद्यार्थी हे वेगवेगळे पदार्थ खात असताना त्याचे व्हिडीओ बनवत असतात. विद्यार्थी हे सध्या हिमाचल प्रदेशात असून त्यांना तिथे उत्तर प्रदेशातून आलेले लाडू खायला मिळाले. हे लाडू खाल्ल्यानंतर ते या लाडवांच्या प्रेमातच पडले आहेत. लाडू खात-खात त्यांची तारीफ करतानाचा एक व्हिडीओ विद्यार्थी यांनी शेअर केला आहे.