भिकारी समजून शोरुमवाल्यांनी हाकलले, त्यानेच खरेदी केली 12 लाखांची बाईक

कुणाच्याही कपडय़ांवरून आणि राहणीमानावरून त्याच्या परिस्थितीचा अंदाज बांधता येऊ शकत नाही हे थायलंडमधील एका घटनेवरून अगदी खरं असल्याचे दिसून आले आहे. बाईकच्या शोरूमबाहेर चित्रविचित्र अवस्थेतील एका व्यक्तीला भिकारी समजून सेल्समनने तेथून हाकलले. मात्र त्याच व्यक्तीने तब्बल 12 लाख रुपयांची अलिशान बाईक खरेदी करत सर्वांनाच तोंडात बोट घालायला लावली.

थायलंडमधील लुंग डेचा नावाच्या एका व्यक्तीचे फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती वृद्ध व्यक्ती कपड्यांवरून भिकारी किंवा मजुरासारखा दिसत आहे. लुंग यांनी शोरूममध्ये प्रवेश करत तिथल्या कर्मचाऱयाला आपल्याला गाडी खरेदी करायची असल्याचे सांगितले. पण सेल्समनला तो भिकारी असल्याचे वाटल्याने त्याने त्याला जबरदस्ती बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी शोरूमच्या मॅनेजरला भेटायची इच्छा व्यक्त केली. शोरूममधील कर्मचारी मात्र हसत होते. हा संपूर्ण गोंधळ ऐकून शोरूमचे मालक बाहेर आले. शोरूमच्या मालकाने देखील त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. लुंग यांनी त्यांना आपल्याला गाडी खरेदी करायची असल्याचे सांगितले. शोरूम मालकाने त्यांना 12 लाखांची हार्ले डेव्हिडसन दाखवली. नंतर त्यांनी आपल्या बॅगेतून रोख 12 लाख रुपये काढले आणि गाडी खरेदी केली. यानंतर शोरूममधील कर्मचाऱयांना आपल्या चुकीची जाणीव झाली.

आपली प्रतिक्रिया द्या