संसदेत फोनवर पॉर्न पाहात होते खासदार, पकडल्यावर सांगितला ‘हा’ बहाणा

नागरिक आपल्या समस्या मांडण्यासाठी आपला आवाज म्हणून संसदेत आपला प्रतिनिधी निवडून पाठवतात. मात्र अनेकवेळा काही खासदार असे काहीतरी करतात की, ज्याची नंतर त्यांना लाज वाटते. थायलंडच्या संसदेतही अशीच एक बाब समोर आली आहे. येथील एक खासदार संसदेत मोबाईलवर नग्न फोटो पाहताना कॅमेरात कैद झाले आहेत. नंतर याबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले असताना त्यांनी एक विचित्र बहाणा सांगितला आहे.

गुरुवारी थायलंडच्या संसदेत अर्थसंकल्पावर चर्चा होणार होती. यावेळी सर्व खासदार अर्थसंकल्पातील कागदपत्रे पाहण्यात व्यस्त असताना खासदार रोनाथेप अनुवत हे फोनवर काहीतरी वेगळंच पाहण्यात व्यस्त होते. यावेळी पत्रकार गॅलरीमध्ये बसलेल्या पत्रकारांनी त्यांचे फोटो घेतले आणि झूम करून पाहिले असताना ते आपल्या फोनवर नग्न महिलांचे फोटो पाहत असल्याचे आढळले. फोटो पाहत असताना त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावरील मास्क काढला होता. मोबाईलमध्ये बराच वेळ ते तीन महिलांचे नग्न फोटो पाहत होते.

याबाबत पत्रकारांनी रोनाथेप अनुवत यांना प्रश्न विचारले असता त्यांनी आपण मोबाईलवर महिलांचे नग्न फोटो पाहता असल्याचे मान्य केलं आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, त्यांना कोणीतरी पैशांची मदत मागण्यासाठी हे फोटो पाठवले होते. फोटो मधील महिलेला कोणत्याही प्रकारचा धोका तर नाही ना, हे जाणून घेण्यासाठी ते फोटोमधील बॅकग्राऊंड काळजीपूर्वक पाहत होते, असे त्यांनी सांगितले. दरम्यान हिंदुस्थानात ही 2012 मध्ये कर्नाटक विधानसभेत दोन कॅबिनेट मंत्री आपल्या मोबाईलमध्ये अश्लील फोटो पाहताना कॅमेऱ्यात कैद झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या