शिवसेनेचा वचननामा: प्रगतीचा ध्यास, ठाण्याचा स्मार्ट विकास

ठाणे – ठाणेकरांच्या हक्काचे धरण पाच वर्षांत बांधणारच, असे वचन देत शिवसेनेने आज ठाणे महापालिका निवडणूक २०१७चा वचननामा जाहीर केला. पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सूट देण्यासोबतच सर्वसामान्यांना परवडणारी घरे, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जलद वाहतुकीसाठी बायपास मार्ग, मल्टिलेव्हल उड्डाणपूल, अत्याधुनिक घनकचरा प्रकल्प, शहरात सीसीटीव्हीचे जाळे, नेचर पार्क, जागतिक दर्जाची चौपाटी, सेंट्रल पार्क अशा दर्जेदार विकासकामांचा संकल्प ठाणेकरांसाठी शिवसेनेने सोडला आहे. युवकांसाठी रोजगार मार्गदर्शन, महिलांच्या सुरक्षेसाठी ऍप्स, जागतिक दर्जाच्या शिक्षण संस्थांमार्फत शिक्षणाची संधी ज्ये‰ नागरिकांसाठी महापालिका रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्ष असा बच्चे कंपनीपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, युवकांपासून ते महिलांपर्यंत सर्वांचाच वचननाम्यात प्रकर्षाने विचार करण्यात आला आहे. ठाण्याचा स्मार्ट विकास हाच शिवसेनेचा ध्यास असा नारा वचननाम्यात दिला आहे.

करसवलत

५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ.

पर्यावरणस्नेही उपक्रम राबविणाऱ्या गृहसंकुलांना मालमत्ता करात सवलत.

व्यापारी, हॉटेल, रुग्णालयांना घनकचरा व्यवस्थापन करातून मुक्ती.

रस्ते व उड्डाणपूल

तीनहात नाका, नितीन कंपनी व कॅडबरी जंक्शनवरील वाहतूककोंडीचा ताण कमी करण्यासाठी इंटिग्रेटेड मोबिलीटी प्लॅन.

तीनहात नाका येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्टीलेव्हल उड्डाणपूल.

सिडको ते गायमुख कोस्टल, श्रीनगर ते गायमुख डोगर, कळवा नाका ते आत्माराम पाटील आणि गायमुख ते साकेत-सिडको बायपास मार्ग.

२५ मॉडेल रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांचे यूटीडब्ल्यूटीच्या माध्यमातून सुधारणा.

पाणी

ठाणेकरांसाठी हक्काचे धरण.

स्मार्ट टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पाण्याचे स्मार्ट वितरण

शिक्षण

अंध मुलांसाठी नॅबच्या धर्तीवर शिक्षण व रोजगार प्रशिक्षण केंद्र.

महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती.

डायघर येथे अडीचशे एकर जागेवर एज्युकेशन हब विकसित करणार.

ई-लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण, प्रभागनिहाय ई-लायब्ररी.

गृहनिर्माण

क्लस्टरच्या अंमलबजावणीसाठी विशेष कक्ष स्थापन करून योजना मार्गी लावणार.

सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणार.

३० वर्षांपेक्षा जुन्या धोकादायक इमारतींना वाढीव एफएसआय देऊन पुनर्विकासाची संधी देणार.

सीआरझेडबाधित कोळीवाडे, मुंबईच्या धर्तीवर इमारतींचा पुनर्विकास.

महिला व बालकल्याण

समस्या निवारणाकरिता महापालिकेची विशेष हेल्पलाईन.

स्थानक तसेच उद्यान परिसरात पाळणाघरे तसेच अतिरिक्त स्वच्छतागृहे.

सुरक्षिततेच्या दृष्टीने ऍप विकसित करून पोलिसांची मदत.

क्रीडा व सांस्कृतिक

घोडबंदर येथील कासारवडवली येथे भव्य स्टेडिअम.

बाळासाहेब ठाकरे स्मारकात विविध कलांचे प्रशिक्षण देणारी बाळासाहेब ठाकरे कला अकादमी, धनुर्विद्या (आर्चरी) प्रशिक्षण केंद्र.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र. फाइन आर्ट्सला प्रोत्साहन देणारे ऑडिटोरिअम. आगरी, आदिवासी, कोळी आदींच्या संस्कृतीची माहिती सांगणारे कासारवडवली येथे कलाभवन.

ग्रँड सेंट्रल पार्क

ठाणे शहराच्या वैभवात भर टाकणारे न्यूयॉर्कच्या धर्तीवर ऍम्फी थिएटर, जीम, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, फ्लोरा गार्डन, आयकॉनिक ब्रीज, क्रेटिंग रिंग, तलाव व भव्य प्रवेशद्वार असलेले ग्रँड सेंट्रल पार्क.

घनकचरा व्यवस्थापन

शास्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट.

प्रत्येक प्रभागात स्मार्ट बिन्स.

उद्याने आणि चौपाटी

२६ किमीच्या खाडीकिनारी देखणी चौपाटी.

रेतीबंदर येथे सिंगापूरच्या मरीना बीचच्या धर्तीकर आंतरराष्ट्रीय दर्जाची चौपाटी.

कागळे इस्टेट येथील रायलादेकी तलाकाचे सुशोभीकरण करून पर्यटनस्थळाचा किकास.

कोलशेत येथे सेंट्रल पार्क, वाघबीळ येथे ट्रफिक गार्डन, मत्स्यालय.

ठळक मुद्दे

दिव्यासाठी स्वतंत्र प्रभाग समिती दिव्याच्या विकासासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद कॅन्सर हॉस्पिटल, संकरा नेत्रालय प्रकल्पाची जलद अंमलबजावणी.

दहा ठिकाणी डायलिसीस केंद्र. शहरात पाईप गॅसचे जाळे. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून जलवाहतुकीला चालना, वॅक्स म्युझिअम, आरमार केंद्र, जुने व नवे ठाणे थीम पार्क.

युवक कल्याण

युवकांसाठी धर्मवीर आनंद दिघे रेजगार मार्गदर्शन केद्र. स्टार्ट ऍप्सना चालना देण्यासाठी शिव इनक्युबेशन हब. स्पर्धा परीक्षांसाठी २४ तास अभ्यासिका व ग्रंथालय.

पर्यावरण

दिवा येथील खाडीकिनाऱयावरील सुमारे पन्नास एकर जागेत नेचर पार्क 5 लाख देशी-विदेशी वृक्षांची लागवड प्रत्येक प्रभागात फुलांची थीम गार्डन्स येऊर व पातलीपाडा येथे निसर्ग उद्यान.

आरोग्य

ठाणेकरांसाठी बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजना.

ज्येष्ठ नागरिकांना महापालिका रुग्णालयांमध्ये ताटकळाके लागू नये यासाठी स्कतंत्र कक्ष, मोफत तपासणी क उपचार.

महिलांसाठी महापालिका रुग्णालयांमध्ये क्षयरोग तपासणी व उपचार कक्ष.

महिलांकरिता पाच मोबाइल कॅन्सर तपासणी पथके.

कॅन्सर होण्याची शक्यता असलेल्या महिलांकर विनामूल्य उपचार.

विशेष प्रकल्प

मनोरुग्णालयाच्या अतिरिक्त जागेवर विस्तारित ठाणे स्थानकाची निर्मिती करून तेथे इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट टर्मिनल व मेट्रो स्थानकाला कनेक्टिव्हीटी. वडाळा-घाटकोपर-ठाणे मेट्रोच्या जाळ्याची व्याप्ती वाढवून घोडबंदर ते बोरिवली, माजिवडा-खारेगाव-शीळ, दिघा-विटावा-कळवा-खारेगाव, ठाणे-कल्याण-भिवंडी या मार्गावर मेट्रोचे जाळे विणण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा.

जलवाहतूक- रेल्वे तसेच रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतुकीला चालना.

रेल्वेच्या सहयोगाने जुन्या ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाचा विकास. कोलशेत येथे ३० एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पार्क. आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय. कलरकेमच्या जागेवर नेहरू प्लॅटोनेरिअमच्या धर्तीवर मंजूर केलेल्या सायन्स सेंटरच्या कामाची जलदगतीने पूर्तता.

घोडबंदर येथे फिल्म इन्स्टिटय़ूट आणि स्टुडिओची उभारणी करून होतकरू कलावतांना प्रशिक्षणासाठी हक्काचे व्यासपीठ. पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणारे वॅक्स म्युझिअम. मुल्लाबाग येथे देश-विदेशातील लँडमार्क्सचे मिनिएचर गार्डन. बँकॉकच्या धर्तीवर थ्रीडी फोटो गार्डन. नागला बंदर येथे आरमार केंद्र व म्युझिअम प्रकल्पाची जलदगतीने पूर्तता. उपवन येथे बनारसच्या धर्तीवर घाट. घोडबंदर किल्ल्यात शिवसृष्टी उभारून पर्यटनस्थळ म्हणून विकास. भारतीय चित्रसृष्टीला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त उभारण्यात येणाऱया थीमपार्कची जलदगतीने अंमलबजावणी.

आपली प्रतिक्रिया द्या