ठाणे : विकृत! कुत्र्यासोबत सेक्स केल्याप्रकरणी तरुणाला अटक

4493

ठाणे पोलिसांनी एका विकृत तरूणाला अटक केली आहे. कुत्र्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली त्याला ही अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात कलम 377 (अनैसर्गिक संभोग) आणि प्राण्यांवरील अत्याचार प्रतिबंध कायदा 1960 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणाविरोधात काही प्राणीमित्रांनी एका समाजसेवी संस्थेच्या मदतीने तक्रार दाखल केली होती.

शनिवारी सागर गुप्ता आणि त्याचे काही मित्र भटक्या कुत्र्यांना खायला घालायला बाहेर पडले होते. त्यांना वागळे इस्टेट परिसरात असलेल्या जुन्या स्कायवॉकवर एक तरुण कुत्र्यावर बलात्कार करत असताना दिसला. त्यांनी याची माहिती 100 नंबरला फोन करून पोलिसांना कळवली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आरोपीला ताब्यात घेतला.

या आरोपीचं नाव विजय चाळके असल्याचं कळालं आहे. हा आरोपी बेघर असावा आणि या स्कायवॉकवरच राहात असावा असं सागर गुप्ता याने म्हटलंय. पोलिसांनी मात्र विजय हा हाजुरी रस्त्यावर राहात असल्याचं म्हटलंय. विजय हा कंत्राटी मजूर असून सध्या तो बेरोजगार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या