ठाण्यातील कळवा खाडीत दोन मुलांचा बुडून मृत्यू, दोघांना वाचवले

19

सामना ऑनलाईन । ठाणे

ठाण्यामधील कळवा खाडीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला असून, अन्य दोघांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. कुलदीप राहूदिया (९) आणि बजेंदर साहना (८) अशी बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावं आहेत, तर जीतू (९) आणि दीपू (१३) यांचा वाचवण्यात आलं आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बुधवारी दुपारी मुलं पोहण्यासाठी कळवा खाडीत उतरली होती. मात्र पाण्याचा अचूक अंदाज न आल्यानं ही मुलं प्रवाहात ओढली गेली. यात दोघांचा बुडून मृत्यू झाला असून, दोघांना वाचवण्यात यश आलं आहे. सर्व मुलं कळवा खाडीजवळील मनिषनागरमधील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या