मला टार्गेट केले जातेय, ठाणे महापालिका आयुक्त जयस्वाल यांचा भाजप, राष्ट्रवादीवर आरोप

सामना प्रतिनिधी । ठाणे

गेल्या काही महिन्यांपासून विशिष्ट गटाकडून मला टार्गेट केले जाते. माझी वैयक्तिक बदनामी करण्याचे कारस्थानही रचले गेले तेव्हापासूनच मी व्यथित आहे, असा आरोपच महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी भाजप व राष्ट्रवादीचे नाव न घेता केला. आजवर मी जे काम केले त्याला ठाणेकरांनी पोचपावती दिली आहे. पण आता बस्स झाले. मलाच ठाण्यात राहण्याची अजिबात इच्छा नाही, असा उद्वेगही त्यांनी आज महासभेत व्यक्त केला.

ठाणे पालिकेच्या महासभेत विकासकामांवरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये हमरातुमरी झाली. त्यावेळी भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर शंका व्यक्त केली तेव्हा आयुक्त जयस्वाल प्रचंड संतापले. ते म्हणाले, ज्यांनी माझा ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून वापर केला, ज्यांच्या नजरेत मी काल-परवापर्यंत हिरो होतो त्यांनीच आज मला ‘झिरो’ केले आहे. काही विशिष्ट घटक माझ्या विरोधात वातावरण तयार करून मला बदनाम करण्याचे कारस्थान करीत आहेत. तर काहींनी माझी बदली व्हावी यासाठीही प्रयत्न केले असा टोलाच आयुक्त जयस्वाल यांनी भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना अप्रत्यक्षपणे लगावला. आता मलाच इथे राहण्याची अजिबात इच्छा नाही. पण सरकार माझी बदली करत नाही, त्यामुळे सभागृहानेच माझ्याविरोधात अविश्वास ठराव आणावा आणि मला इथून परत पाठवावे असा निर्वाणीचा इशाराच आयुक्तांनी सभागृहाला दिला.

बदली होत नाही तोपर्यंत सुट्टीवर
एप्रिलपर्यंत माझी बदली झाली नाही तर मी सुट्टीकर जाईन, असा इशाराही आयुक्तांनी याकेळी दिला. खरंतर मी आजपासूनच सुट्टीकर जाणार होतो; परंतु काल रात्री मला एकाने आश्कासन दिल्याने मी सुट्टीचा निर्णय बदलला. आता मात्र जोपर्यंत माझ्या बदलीची ऑर्डर येत नाही तोपर्यंत मी सुट्टीकर जाईन, असे सांगून आयुक्त थेट सभागृहाबाहेर निघून गेले.

माझे रिपोर्टकार्ड जनतेकडे
माझे पालिका सभागृहातील सदस्यांबरोबर अनेकदा भांडण झाले आहे. मात्र मी ते कधीही कैयक्तिक पातळीकर नेले नाही. हुकूमशहा, औरंगजेब, जिझिया कर अशा उपाध्या देत माझ्याकर टीका झाली. माझ्याकिरोधात काही घटक कारस्थाने करीत असले तरी जनतेने माझे रिपोर्टकार्ड दिले आहे, असे आयुक्तांनी ठणकावले.

आपली प्रतिक्रिया द्या