बांधकाम व्यावसायिकाने मनमानी पद्धतीने तयार केलेल्या लेबर कॅम्पवर नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने बुलडोझर चालवला आहे. सीवूड्स रेल्वे स्थानक परिसरात सेक्टर 25 येथील पालिकेच्या मलनिस्सारण केंद्राजवळील भूखंडाभोवती हिरव्या जाळीचे कुंपण लावून बेकायदा झोपड्या उभारल्या जात होत्या. पालिकेच्या या धडक कारवाईमुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पालिकेचा अतिक्रमण विभागही ‘अलर्ट मोड’वर असून पालिकेने नुकतेच मुख्यालय स्तरावर केंद्रीय अतिक्रमण पथक स्थापन केले आहे. बांधकाम व्यावसायिकाकंडून मात्र मनमानी करण्यात येत असून सीवूड्स सेक्टर 25 येथे नवीन टॉवरचे काम सुरू असून याच ठिकाणी विकासकाकडून बेकायदा लेबर कॅम्प उभारण्यात येत असल्याने अतिक्रमण विभागाने या झोपड्यांवर कारवाई केली आहे.