ठाण्यातील पोलिसांना हक्काची घरे देणारच; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

31

सामना ऑनलाईन । ठाणे

वसाहती वाढतात पण पोलीस ठाणी मात्र होत नाहीत. पोलीस ठाणीही वाढली पाहिजेत असे सांगतानाच पोलिसांना मालकी हक्काची घरे हा प्रकल्प ठाण्यात व्हाययलाच हवा आणि ठाण्यातील पोलिसांना हक्काची घरे देणारच, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

कासारवडवली येथील आधुनिक पोलीस ठाण्याचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मिनाक्षी शिंदे, पोलीस आयुक्त परमबीर सिंह, पालिका आयुक्त संजीव जयस्वाल उपस्थित होते. अॅमेनिटी भुखंडाच्या माध्यमातून महापालिकेने बांधून दिलेले हे पोलीस ठाणे अभिनव आहे असे सांगतानाच मुख्यमंत्री म्हणाले ठाण्यासाठी जे जे लागेल ते ते सरकार नक्की देईल.

पालकमंत्री ओपनिंग बॅट्समन
राज्याचा मी मुख्यमंत्री असलो तरी आमचे ओपनिंग बॅट्समन तुम्हीच आहात असे फडणवीस यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून सांगितले. तेव्हा टाळ्य़ांचा गजर झाला.

ऑनलाईन तक्रारी घेणार
येत्या काळात जनेतला तक्रारी करण्यासाठी पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागणार नाही. कारण संपूर्ण राज्यात ऑनलाईन पोलीस तक्रारी करता येतील. हा प्रकल्प लवकरच साकारला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या